माझ्यासाठी योग म्हणजे स्वतःच्या शरीराला समजून घेण्याचा आणि त्याची प्रेमाने काळजी घेण्याचा एक सुंदर मार्ग आहे. दररोजचा योगाभ्यास, नैसर्गिक आहार आणि निरोगी जीवनशैली या छोट्या-छोट्या सवयी आपल्या शरीरात आणि मनात सुंदर बदल घडवू शकतात, यावर माझा मनापासून विश्वास आहे. याच विचारातून Natural Skin Glowing & Repairing हा आमचा प्रवास सुरू झाला. योग्य Routine, नैसर्गिक आहार आणि सातत्यपूर्ण Lifestyle यामुळे आतून होणारा बदल आम्ही अनुभवला आणि अनेकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. जीवन हे निरोगी, संतुलित आणि सुंदर जगण्याचं हे कौशल्य प्रत्येकालाच शिकता यावं — हाच Kaushalyam चा छोटासा प्रयत्न आहे.

योग सराव केवळ शारीरिक व्यायाम नसून शरीर, मन आणि आत्म्याचा समतोल साधण्याचा मार्ग आहे.
नियमित आसने व सूक्ष्म व्यायामाद्वारे शरीरातील ताठरता दूर करून लवचिकता व ताकद वाढवा.
प्राणायाम आणि ध्यानाच्या सरावाने मानसिक चिंता, स्ट्रेस दूर करून मन शांत व एकाग्र करा.
आयुर्वेदिक दिनचर्या व योगाचा मेळ घालून आयुष्यात सकारात्मकता व सुदृढ आरोग्य मिळवा.
दररोज सराव केल्यावर तुमच्या शरीरात आणि मानसिक स्वास्थ्यात दिसणारे बदल:
स्नायूंची ताकद वाढते आणि शरीर चपळ व लवचिक बनते.
चिंता, ओव्हरथिंकिंग कमी होऊन मनाची एकाग्रता वाढते.
PCOD, थायरॉईड आणि पचनसंस्थेचे आजार नैसर्गिकरित्या नियंत्रित होतात.
पाठीचे दुखणे, मानदुखी व चुकीचे पोस्टर पूर्ववत सुधारते.
मन शांत होण्यास, शरीर रिलॅक्स होण्यास आणि झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते.
रक्ताभिसरण सुधारून त्वचेवर नैसर्गिक ग्लो व तेज येते.
दररोजचे लाईव्ह सत्र शास्त्रीय पद्धतीने ४ सोप्या भागात विभागलेले असते.
सांध्यांची हालचाल, ताठरता दूर करणे आणि शरीराला योगासनांसाठी तयार करणे.
स्टँडिंग, सिटिंग आणि पाठीवर/पोटावर झोपून करायची प्रभावी आसने.
अनुलोम-विलोम, कपालभाती, भ्रामरीद्वारे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवणे.
मनाला खोल विश्रांती देणारी योग निद्रा व एकाग्रतेसाठी ध्यान.
पुढील बॅचची तारीख व नाव नोंदणी लिंक सर्वप्रथम मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp कम्युनिटीत सामील व्हा.
WhatsApp वर अपडेट्स मिळवा